Friday, November 28, 2008

"त्सुनामी"

मागच्या आठवड्यात काही कामानिमित्त चेन्नईपासुन ३५० किमी अंतरावर असलेल्या कारेकल पोर्टवर गेलो होतो. पाच दिवस तिथेच साईटवर होतो. त्या दरम्यान समुद्राचं जे रौद्र रुप पाहायला मिळालं ते अवर्णनियच होतं. वाटलं "त्सुनामी" च्या काळात काय उत्पात घातला असेल या बाबाने.........

त्सुनामी

उद्दंड जाहल्या लाटा
तांडव करीती वारे
स्तब्ध चंद्रमा नभात
हरवुन गेले तारे...

बेभान जाहली गाज
सागरा जावु कसा रे
सारे किनारे संपले
कसा आवरु पिसारे...

मिठीत घेण्या धरणी
करशी किती पसारे
डोळ्यात दाटले पाणी
सांगु वेदना कशा रे

पांघरशी स्वप्न निळे
स्वप्नांचे धुंद मनोरे
स्नेह तुझा ओसरला
रे बघ खुंटले फुलोरे

विशाल

No comments: