Wednesday, December 10, 2008

याचनामाग सख्या हवे तुला जे
तु एकांत माझा मागु नको..
छाया तुझीच मी सखया
तु अंत असा रे पाहु नको !!

तुझ्य कवेत हे भान हरावे
ते क्षण सौख्याचे सांडु नको..
मी विसरले देह-भान माझे
तु शुद्ध मनाची मागु नको !!

वाटेवर तुझ्या क्षितिज सांडलेले
वाट पाहण्याची ओढ सोडु नको..
मम स्वप्नी अलगद डोकावताना
तु स्वप्न माझे मागु नको !!

डोळ्यात माझ्या नकळत लपताना
तु अश्रु माझे मागु नको ..
प्रीत माझी विसरताना
तु स्मृती माझ्या मागु नको !!

No comments: