Wednesday, December 10, 2008

शापित

 

तुझं रुपडं
एक जिवंत कविता ..
सतत बदलणारी
तुझी विविध रुपं...
एक मुर्तिमंत काव्य..
तुझे मोहक विभ्रम
त्यात दडलेल्या
कविंच्या संकल्पना
आणि तरीही...
तु शापित...?

महीनो न महीने
तुझ्यासाठी तिष्ठणार्‍या
चकोराचे समर्पण
तुझ्या डागांचेदेखिल
आम्हाला वाटणारे
अनामिक आकर्षण
हे देखिल गुढच..
आणि तरीही.........
तु शापित...?

तुझी प्रत्येक प्रतिमा
धुंदावणारी
मनाला लोभावणारी
धुंद प्रेमिकांना
हळुवार खुणावणारी
विरही मनाला
शांतवणारी..
आणि तरीही......
तु शापित...?

का हा...
प्रकाशाच्या माथ्यावर
कायम...
अंधाराचा टिळा..!

No comments: