Wednesday, December 10, 2008

लतास.........


तुझे गाणे तुझे नाही
तुझे असणे तुझे नाही
ते किंचित हंसणे तुझे नाही..

तो गंधार, तो मल्हार
असतील ते सुर तुझे,
पण त्याचे वेड तुझे नाही !

तुझ्या ओठीचा शब्द
तुझ्या गळ्याचे सुर
व्यसन कोकीळे ते तुझे नाही !

तुझ्या सुरातली तंद्री
तुझ्या स्वरातली धुंदी
ते धुंदावणे तुझे नाही !

तानपुर्‍याची मधुर तान
किंचित लवणारी सुरेल मान
ते वेडावणे तुझे नाही !

तुझे सुर श्वासात भिनलेले
त्या स्वरांसह श्वासांची
गती वाढणे तुझे नाही!

तो हक्क आम्हा रसिकांचा
तुझ्या गळ्याच्या गुलामाचा
ते भाग्य कोकिळे तुझे नाही 

No comments: