कधी शब्द ते वत्सल
कधी प्रहार झेलायाचे
कधी ओंजारणे स्नेहाळ
कधी आघात सोसाट्याचे
मनात असते कायम
भय आंधळ्या डोहाचे
अंधारभुल होते धुसर
सुसाट वारे दु:खाचे
येते नभा पल्याडुन
बोलावणे कधी सौख्याचे
कधी कोसळणे आकाश
ओझे ते अनपेक्षिततेचे
कोवळ्या अन किरणांतुनी
ओघळणे कधी सुर्याचे
रखरखाट कुठे तप्तसा
हे जगणे असंतुलनाचे
मी शोधतो वाट माझी
सोडवीत गुंते रस्त्यांचे
सुटले नाही अजुनही
मज गणित आयुष्याचे
05/12/2008

No comments:
Post a Comment