Friday, December 5, 2008

सावळा

सावळ्याची तनु सावळी
सावळ्याची सावली सावळी
राधा मनी खंतावली
मी का न झाले सावळी

सावळ्याच्या मुरलीसवे
सुर येती होवुन सावळे
काय झाले माझे मला
राधा बिचारी तिज न कळे

गंधावली गवळण वेडी
सावळा तिचा रास खेळी
सावळ्याची प्रीत मनी
सावळा तो जळी स्थळी

पैलतीरी सावली सावळी
राधिकेला साद घाली
गोपिका वेडावुन गेली
धुंदावते बासरी सावळी

प्रीत सावळी, भाव सावळा
नंदाचा तो श्याम सावळा
सुखाची चाहुल सावळी
राधेची गं दुनियाच सावळी

No comments: