Wednesday, December 10, 2008

शोकांतिका


काल रात्री
मो. क. गांधी भेटले होते
महात्मा गांधींना पाहिलंसका?
म्हणुन विचारत होते
त्यांनी म्हणे कधीकाळी
रामराज्याचा संकल्प सोडला होता
काल सांगत होते
त्यांच्या रामराज्यातला
रामच हरवला होता
त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं
पोरा..
आजकाल सगळेच
गांधीवादी झालेत
बहुतांशी खादी(?)वादी झालेत
आज समाजात
खादीला(?) मोठा मान आहे
मनात गांधी नसला तरी
डोईवर गांधीटोपीची शान आहे
गांधीवादातला वाद राहिलाय
गांधी कुठेतरी हरवलाय....!
कुणी येताय का शोधायला..
हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय..
काल रात्री
मोहनदास करमचंद गांधी भेटले होते
हरवलेल्या महात्म्याला..
एकटेच शोधत होते...!


No comments: