Wednesday, December 10, 2008

वळीव


माज्या मायनं मया
सकाय सकाय सांगटलेलं
जात्याव बसल्याबसल्या
आविष्याचं कोडं उकिलल्यालं
जगणं..त्यात सगरंच समाईक...

कंदी नशीबात सुक
त कंदी भारंभार दुक
काळजातलं
रडगाणं मातुर
सगर्‍यांचच समाईक....

कुटं भुक मानसाला मारतिया
कुटं मानुसच
मानुसकी खातुया
कंदीकंदी भुकच खावुन
सुकाची ढेकर देतुया....

नायतर आमच्यावानी
उंद्याची वाट पगत जगतुया
सा मैन्यातुन येणार्‍या
वळवासाटनं..
आविष्यभर वाट पगतुया....

No comments: