Wednesday, December 10, 2008

जाणं फुलराणीचं...


फुलाचं कोमेजणं
गृहितच धरलेलं
तरीही तुझं अकाली जाणं
मनात, कुठेतरी आत
.......खोलवर जखम करुन गेलेलं.

तुझ्या असण्याने आमचं
भावविश्व सांभाळलेलं
आज तुझ्या नसण्याने
आमचं ते असणंच गमावलेलं.
.......मनाच्या पातळीवर काही हरवलेलं

तुझ्या अभिनयाने
जगणं शिकवलेलं
जगावेगळ्या तुझ्या एक्झीटने
आमचं जगणंच विसरलेलं.
......आपलं असं काही कायमचं दुरावलेलं

तुझ्या अस्तित्वाने आमच्या
जाणिवांचं भान राखलेलं
अशा अचानक जाण्याने
नकळत सगळंच विसकटलेलं
......मनाचं असं भरकटणं कागदावर उमटलेलं !

No comments: