Wednesday, December 10, 2008

मर्म


भडकलेल्या चितेला
कधी कुणी विचारलंय
........प्रिये तुझी जात काय?

तेजाळणार्‍या तिच्या ज्योतीला
कधी कुणी विचारलंय
.........सखे तुझा धर्म काय?

न टळणार्‍या मृत्युला का
कधी कुणी विचारलंय
.........बंधो, तुझं कर्म काय?

हेच एकमेव सत्य आहे..
सत्याला कधी कुणी विचारलंय
..........गड्या रे, तुझं मर्म काय?

1 comment:

Anonymous said...

surekh...1dam mast