Wednesday, December 10, 2008

बंध


श्वास म्हणाला कुडीला
सखे,
जन्मो-जन्मीचा ऋणानुबंध आपला.
तुझं माझं नातं
जे आभाळाशी मातीचं
सागराशी क्षितीजाचं
जे नातं असतं
रुसलेल्या कपोलांशी
तिथेच रेंगाळलेल्या आसवांचं
एकमेकांशी आपलं समर्पण
जगावेगळ्या ओढीचं
माझ्याशिवाय तुझ्या
असण्याला अर्थ नाही
तु नसशील तर
माझ्या असण्याची
मुळी आवश्यकताच नाही.
परस्परांशिवाय आपलं
असणं मुळी
अपेक्षितच नाही.

No comments: